Worth a visit !
By Jayashree Lembhe, September 10, 2018
(in Marathi language)
लहानपणी एप्रिल मे महिना आला कि "झुकझुक झुकझुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावी जाऊया ..$$ " चे वेध लागायचे. पण सध्या जॉब मुळे सगळं जरा कठीणच.. अगदीच मामाच्या गावी नाही पण 2 दिवस कोकणात जायला मिळाले तेही #TCSEcologyClub सोबत #VelasTurtleFestival साठी..! आणि सर्वजण लहान होऊन यथेच्छ आंधळी कोशिंबीर, शिरापुरी, अंताक्षरी, छोटी मच्छली-बडी मच्छली, थाळी फेक, खो-खो, बॅट बॉल, झोका खेळलोत..!! मी परत एकदा बालपण जगून घेतले. वेळास च्या किनाऱ्यावर चिमुकली पावलं टाकत नवीन विश्वात जाणारी लहान लहान समुद्री कासवं पाहताना डोळ्याचे पारणे फिटले...वेळास गाव, मोहन सर आणि टीम च कौतुक व खुप सदिच्छा.. #KeepUptheGoodWork #TurtuleConservation एक दिवस without WhatsApp, FB राहिले अन अनुभवलं स्वादिष्ट कोकणी जेवण, मनमिळावू माणसं, टुमदार घरं, नागमोडी रस्ते, वेळास चा निळाशार अथांग समुद्र आणि सूर्यास्ता सारखे शांत व निश्चल मन...!
रात्री ताऱ्यांच्या सोबतीनं रंगलेली गप्पांची मैफिल, फुल्ल आणि हाल्फ गियर मारत पार केलेली अंतरे, प्रत्येक गावाचे ST स्टॅन्ड दाखविणारे भावी परिवहन मंत्री, बाणकोट किल्ल्या ची सफर, Brahmini kite, हरिहरेश्वर च मंदिर, श्रीवर्धन च्या समुद्रात केलेली धमाल मस्ती...आणि याला चार चांद लावले ते पारश्या-आर्ची, राणा दा आणि London च्या पाहुण्याने. मग सुरु झाला परतीचा प्रवास व अन् जोडीला अंताक्षरी..
ताम्हीनी घाटाचा गार गार वारा आणि गरम चहाचे घुटके घेऊन आम्ही पोहचलो SP office ला...पुन्हा भेटू रे/गं च आश्वासनं देत सर्वांनी निरोप घेतला.! यावेळी ही नवीन मित्र-मैत्रिणी भेटले ; काही जुने लोक नव्याने कळाले आणि मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले..:) पण माझं मन मात्र अजूनही वेळास च्या किनारी रमलयं, त्या छोट्या कासवांना शोधतंय..