Kalsubai trek

Eventful Trek

26-27th January 2018

by Jayashree Lembhe

A wise man once said climb mountains not so that the the world can see you but so that you can see the world...!👍👍

२०१८ सालाची सुरुवात हटके करायचे असे ठरवले, पण करायचं काय ?🤔 २६ जानेवारी ची संध्याकाळ आणि जोडुन आलेल्या सुट्ट्या हा योग चुकवून कसे चालेल 😉 मग काय झाला प्लॅन आणि टीम २६ जानेवारी रात्री ९ ला निघाली कळसुबाई ट्रेक ला...!🚌

#Kalsubai ⛰ कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर..उंची १६४६ मीटर म्हणजेच ५४०० फुट... *महाराष्ट्राचं एवरेस्ट* असा नावलौकिक मिळवलेले..! प्रत्येक भटक्याचा स्वप्नावत ट्रेक... मग त्याला आम्ही अपवाद कसे असू 🙃🏕️

'बारी' गावात नाश्ता चहा करून पहाटे ३.३० ला चढाई सुरु केली. 🚶🏻♂🚶🏻♀ बहुतेक जण प्रथमच टॉर्चच्या प्रकाशात ट्रेक करण्याचा अनुभव घेत होते, पहिले १०-१५ मिनिटे सर्वांची दमछाक झाली 😓😓 पण नंतर छोटे ब्रेक घेत, जंगलातील गार गार वारा अंगावर झेलत, लिंबू पाणी चा आस्वाद घेत, स्वतःचा अहंमपणा, त्रास-थकवा दूर ठेवून, आकाशातील असंख्य ताऱ्यांची जमलेली मैफिल जणू काही आम्हाला सांगत होती की तुझं हि अस्तित्व असचं झालयं. सध्या त्या शहरातील झगमगटात हरवून गेलंय, जरा दूर जाऊन स्वतःला पहा, शोध, तु पण असाच चमचम ता तारा आहेस.. अंधारात प्रकाश वाटा बनणारा..!😇🤓

मजल दरमजल करत, एकाग्रतेने ४ लोखंडी शिड्या चढून सकाळी ६.३० ला आम्ही सर्व शिखरावर पोहचलो. आणि तिथलं विहंगम दृश्य पाहून थक्क झालो, छोटेसे पण सुंदर असं कळसुबाईचं मंदिर, तिकडं क्षितिजावर रंगांची सुरु झालेली उधळण, सूर्यदेवाला आपल्या कॅमेरा मध्ये कैद करण्याची सुरु असलेली ट्रेकर्स ची लगबग...आणि आम्ही आहोत अशी याची जाणीव करून देणारे हरिशचंद्र, अलंग, मदन, कुलंग किल्ले.... बेभान थंडगार वारा..व निरव शांतता..!😍

अशी सकाळ कुणाला नको असेल ना? मनसोक्त ग्रुप फोटो, सेल्फी काढून, देवीचं दर्शन घेत, सूर्य किरणांची ऊब सोबतीला घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.👭👫👬⛳️

येताना ऊन मी मी म्हणत होतं, पण लिंबू पाणी आणि सावली ची साथ घेत, मातीत घसरत-पडत आम्ही ३ तासात पायथ्याला पोहचलो. रुचकर असे घरगुती जेवण करून दुपारी १ ला पुणे कडे प्रस्थान केले. येताना बस मध्ये गाणी, मज्जा मस्ती करत प्रवास कधी संपला आणि पुणे आले समजलेच नाही. सर्वजण थकले होते तरीपण चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, काहीतरी मिळावल्याचा 😊

*"It is not the mountain we conquer but ourselves"- Edmund Hillary*

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, संपूर्ण प्रवास, ट्रेक तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता. *धन्यवाद आणि असेच अजून अनेक शिखरं सर होवोत,हीच सदिच्छा!!!*

Keep Exploring👍👍☺️

Other Blogs


  1. Kotligar Trek

  2. Jayashree's Blogs
  3. Velas Festival
  4. Raigad Trek
  5. Rajamachi Trek
  6. Harishchandragad
  7. Kalsubai Trek
  8. Hampi Tour

photo of author Jayashree

The Author : Ms.Jayashree Lembhe an IT Engineer, is an enthusiast in Trekking, tree plantation activies and other cultural activities.