TREK TO RAJAMACHI

Thirsty Rovers-09

माझा अविस्मरणीय राजमाची ट्रेक - असं कुणीतरी म्हंटलय कि :

"Fill your life with adventures, not things.Have stories to tell not stuff to show..!"

मान्सून म्हटलं कि ट्रेक आणि जंगल भटकणं आपसूक आलंच, त्यात राजमाची चा ट्रेक आहे म्हटल्यावर तर उत्सुकता शिगेला पोहचली. शनिवारी 15 जुलै ला सकाळी सर्व पिक अप करून आमचा ताफा रवाना झाला राजमाची कडे..! लोणावळा पार करत, पोहे आणि चहा चा पोटभर नाश्ता करून फणसराई पर्यंत बस अगदी सहज आली. सुरुवातीलाच चहू बाजुंचे धबधबे, पाऊस आणि हिरवागर निसर्ग पाहून मन अगदि प्रफुल्लीत झाले. सर्व सूचना ऐकून आमच्या गटाने सकाळी 10.30 ला ट्रेक ची सुरुवात केली. मळलेल्या वाटा, लहान मोठे धबधबे, चिंब भिजलेली झाडांची पाने, हिरव्या रंगाच्या अगणित छटा, चिखल आणि गार गार पाऊसाचे थेंब अंगावर झेलत आम्ही दुपारी १ वाजता राजमाचीच्या मधल्या खिंडीत पोहचलो.

थोडी उसंत घेऊन टीम राजमाची चा भाग १ म्हणजे श्रीवर्धन सर करायला सज्ज झाली. चढाई थोडी काळजीपूर्वक करावी लागली, निसरडे दगड, सतत वाहणारे धबधबे आणि कमरे ऐवढे पाणी यातून वाट काढत साधारण ३०-४० मिनिटात आम्ही किल्ल्याचा माथा गाठला..! किल्ल्याच्या माथ्या वरून दिसणारे दृश्य विहंगम होते, दाट धुके आणि मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरी यांची गंमत काही औरच....गडाचे दरवाजे, पाण्याची टाकं, बुरूज आणि भगवा...सगळं कसं शिवकालीन । आम्ही शिवाजी महाराज कि जय आणि हर हर महादेव च्या घोषणेने वातावरणात अजून उत्साह आणला. एक अस्मादिक शांती, पावसाचं वेगळेच गाणं, आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवून आम्ही किल्ला उतरायला सुरु केला. सगळे इतके निसर्गात इतके तल्लीन होते की कधी पायथ्याला पोहचलो समजलेच नाही.

आता मात्र कडकडून भूक लागली होती, जेवणावर मस्त ताव मारून सगळं फस्त करून टाकलं पण ट्रेक इथेच संपत नाही, अजून भाग २ खुणावत होता. मग काय परत चढाई साठी टीम तयार - मनरंजन ! तसा हा टेहळणीसाठी वापरला जाणारा किल्ला लहान आहे, काही मिनिटात आम्ही गड फत्ते केला. उधेवाडी गावाची दुसरी बाजू अगदी स्पष्ट दिसत होती, गडाची दारं, पाण्याची टाकं, भगवा ध्वज आणि बुरुज अजूनही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. इथे जरा फोटो काढायला वाव मिळाला पण काही क्षणच पाऊस आपले काम चोख बजावत होता, धो धो सुरु झाला मग आम्ही पण हळूच गड उतरायला लागलो. पायथ्याला सर्वांनी थोडी विश्रांती घेतली, ग्रुप फोटो काढले आणि दु.३.४५ वाजता परतीच्या प्रवास सुरु झाला.

पाऊस काय थांबायचं नाव घेईना आणि आम्ही पण डोळ्यांच्या कॅमेऱ्यात सर्व आठवणी साठवतं, नखशिखांत भिजत, जंगल पाहत, पाण्यातून वाट शोधत आम्ही झपाझप पाऊले टाकत दोन तासात फणसराई गाठली.

मस्त वाफाळलेला गरम गरम चहा आणि पारलेे जी बिस्किटं म्हणजे दुर्वांकुर ची थाळीच जणू..! सर्वांनी पेटपुजा आटोपून बस मध्ये सीटस् पकडल्या. तोपर्यंत बऱ्यापैकी तिन्हीसांज झालेली शांत परिसर, धोधो कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज, चमकणारे काजवे, गार गार वारा अंगावर घेत आणि हे नयनरम्य दृश्य मनात साठवून आम्ही घराकडे प्रवास सुरु केला. बऱ्याच मंडळींचा हा फर्स्ट ट्रेक होता, मला त्यांचं कौतुक करावे वाटते. कारण खरचं राजमाची हा एक भन्नाट ट्रेक आहे, अंदाजे २० किमी ची भटकंती, २ किल्ले यासाठी बरीच energy आणि उत्साह हवा.

दिवसभर रपरप पडणाऱ्या पावसाने काही ठिकाणी बरेच पाणी साठलेले, चिखलाने रस्ते खचून भरलेले. नेमकी एक बस या चिखलात अडकली आणि मागे सर्व ट्राफिक जॅम झाले. खूप प्रयत्न झाले पण यश नाही. शेवटीं पुण्यावरून दुसरी बस बोलावली आणि सर्वांनी एकच जल्लोश केला. अशावेळी रात्री अपरात्री परिस्थितीच गांभीर्य राखून रोव्हर्स नी एकी जपून ठेवली, सर्वांचं खूप कौतुक! सर्व हितचिंतक आणि मदतीच्या हातांचे शतश: आभार निसर्ग आणि adventure म्हंटले कि असे प्रसंग येणार च, टीम ने सर्वांच्या सोबतीने यावर खंबीरपणे मात करत सर्वजण सुखरूप घरी पोहचले. निसर्ग सौंदर्य, ट्रेकिंग चा आंनद, प्रसंगावधान, आत्मविश्वास आणि एकिचे बळ याच या राजमाची ट्रेक च्या अविस्मरणीय आठवणी..!!


photo of author Jayashree

The Author : Ms.Jayashree Lembhe an IT Engineer, is an enthusiast in Trekking, tree plantation activies and other cultural activities.

IMAGES

Sculpture on stone

Sculpture on Stone

Rajamachi treckking group

Rajamachi Treckking Group

Entrance to Fort

Entrance to Fort

Rajamachi hill

Rajamachi Hill